कोल्हापूर – गुजरातच्या अमोल ला एक नंबर कसं करता येईल हे एकच महायुतीच्या आघाडीचं स्वप्न आहे. गोकुळला खाली खेचायचा त्यांचा उद्देश आहे. त्यामुळे आत्ताच काय तो निर्णय घ्या असे म्हणत माजी आमदार राजू बाबा आवळे यांनी ही लढाई अस्तित्वाची लढाई असल्याचे म्हटले आहे. ते करवीर तालुक्यातील चुये येथील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या प्रचार सभेत बोलत होते.
गोकुळ दूध संघ जिल्ह्यात राहिला पाहिजे यासाठी ही लढाई सुरू झाली आहे. एका बाजूला आमदार सतेज पाटील आहे तर दुसऱ्या बाजूला बलशाली मंत्रिमंडळ आहे. त्यामुळे पुढे रस्त्यावर लढण्यासाठी तुमच्यासाठी कोणी नाही .गोकुळ टिकवण्यासाठी ही लढाई सुरु झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.




