किसन चौगले यांचा समविचारी आघाडीत प्रवेश…
कोल्हापूर – गोकुळ वाचवण्यासाठी राधानगरीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीला मोठा पाठिंबा मिळालाय . गोकुळचे माजी संचालक किसन चौगले यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज समविचारी आघाडीत जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर आमदार सतेज पाटील यांनी किसन चौगले यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यामुळे तसेच स्वाभिमान जपण्यासाठी हा मोठा निर्णय घेतल्याचे किसन चौगले यांनी,सांगितले. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी किसन चौगुले यांच्यासह राजर्षी शाहू समविचारी आघाडीत प्रवेश केलेल्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानले. गोकुळची ही निवडणूक कोणत्याही एका पक्षाची किंवा व्यक्तीची नसून ही साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई आहे. एखाद्या कार्यकर्त्यावर अडचण येते त्या काळात पाठीशी उभ्या राहणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा योग्य सन्मान केला जाईल, त्यांच्यावर कधीही अन्याय होऊ दिला जाणार नाही. असं सांगून राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून किसन चौगले यांची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर करण्यात येत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी स्पष्ट केले आहे. या गटाने दाखवलेली एकजूट कौतुकास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय. निवडणुकीसाठी आता अवघे १० दिवस शिल्लक असल्यानं सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात आणि भागात राहून दूध उत्पादकांशी संपर्क साधावा, तसेच गोकुळवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांचीच सत्ता आणण्यासाठी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन आ.सतेज पाटील यांनी केले आहे.
यावेळी बोलताना किसन चौगुले म्हणाले कि, राधानगरी तालुक्यात पक्षाकडून कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले गेले नाही. आम्ही १४ वर्षे पक्षाचे नेतृत्व केले असून आमचा स्वाभिमान कधीही गहाण ठेवलेला नाही. गोकुळ दूध संघाचा टर्नओव्हर साडेचार हजार कोटींपर्यंत पोहोचवण्यात आणि शेतकऱ्यांचे भले करण्यात आमदार सतेज पाटील यांचे मोठे योगदान आहे. गोकुळ दूध संघ वाचवण्यासाठी आणि साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या हितासाठीच आम्ही सर्वजण समविचारी आघाडीत प्रवेश करत आहोत असल्याचं त्यांनी सांगितले.
यावेळी राजेंद्र भाटळे, राजेंद्र पाटील सरवडे,विश्वास पाटील, नानासो पाटील, युवराज बर्गे, संतोष पाटील, भिकाजी एकल ,विनय पाटील ,पापा पाटील, दीपक किल्लेदार, सर्जेराव पाटील ,सुरेश चौगुले, विश्वास पाटील तारळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.




