गोकुळ निवडणूक ; अर्जांच्या छाननीला सुरुवात…

पोलिस आणि उमेदवारांमध्ये किरकोळ बाचाबाची

कोल्हापूर – गोकुळच्या संचालक पदाच्या २५ जागांसाठी ३०१ इच्छुकांचे ४३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्या दिवशी ८२ इच्छुकांनी ११५ अर्ज दाखल केले. आजपासून अर्जांच्या छाननीला सुरुवात झाली आहे. दरम्यान पोलिस आणि उमेदवारांमध्ये किरकोळ बाचाबाची झाल्याचे पहायला मिळाले. रमणमळा येथील बहुउद्देशीय सभागृहात सुरु असलेल्या छाननीवेळी उमेदवार वकिलांसह उपस्थित आहेत.
पहिल्यांदा सर्वसाधारण गटातील छाननीला सुरुवात झाली आहे. त्यानंतर कोणी हरकत घेतली, तर त्यावर निर्णय होईल. त्यानंतर इतर गटातील छाननीला सुरुवात होणार आहे. अशी टप्प्याटप्प्याने छाननी होणार आहे.

Scroll to Top