गटाराच्या कामात ९८ कोटींचा सोन्याचा खजिना…!

ब्रुसेल्स : बेल्जियममधील सिंट-गिलीस-डेंडरमोंडे येथे गटाराच्या पाइपलाइनचे काम करताना १८ वर्षीय कोबे या विद्यार्थ्याला तब्बल ९ दशलक्ष युरो (सुमारे ९८ कोटी रुपये) किंमतीचा सोन्याचा खजिना सापडला. खोदकामादरम्यान त्याला सोन्याची नाणी, आणि सोन्याचे बार आढळले. हा खजिना जुन्या बिअर ब्रुअरीच्या इमारतीजवळील तळघराच्या भिंतीत लपवून ठेवण्यात आला होता. माहिती मिळताच प्रशासनाने खजिना ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी हलवला. खजिना कोणी व कधी लपवला, याचा तपास सुरू आ

दरम्यान, कोट्यवधी रुपयांचा खजिना सापडल्यानंतरही तो स्वतःकडे न ठेवता प्रशासनाच्या स्वाधीन केल्याबद्दल कोबेच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

Scroll to Top