राजकीय

खरातसाठी छत्री धरल्यामुळे चाकणकरांना अध्यक्षपदावरून हटवलं, मग खरातचे पाय धरणारे राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का? : रवींद्र धंगेकर

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

पुणे – भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावर आता मराठी चित्रपट येत असल्याने आणखी चर्चांना उधाण आले आहे. अशात माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करून खरात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत हल्लाबोल केला आहे.
रविंद्र धंगेकर यांनी म्हटले आहे कि, “खरात प्रकरणात खरातसाठी छत्री धरल्यामुळे रूपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले, मग खरातचे पाय धरणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीत वेगळा न्याय का?
देवेंद्रजी, न्यायाची भूमिका घेताना व्यक्ती पाहून निर्णय होऊ नये. रूपाली चाकणकर यांच्याबाबतीत जो निकष लावला, तोच चंद्रकांतदादा पाटील यांच्याबाबतीतही लावला पाहिजे. चंद्रकांतदादांसाठी खरात बाबाने वेगळा टेबल मांडला होता का..?, असा खरमरीत सवाल त्यांनी केला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top