राजकीय

“सहा महिने मला पालकमंत्री करा, सहा महिने गृहमंत्री करा, सगळ्यांच्या बत्त्या गुल केल्या नाहीत तर बघा” : खा. निलेश लंके

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

अहिल्यानगर – “पोलीसवाले खूप त्रास देतात. मी त्यांना सांगतो, जरा थांबा, सरकार येऊ द्या. सहा महिने मला पालकमंत्री करा. सहा महिने गृहमंत्री करा. सगळ्यांच्या बत्त्या गुल केल्या नाहीत तर बघा.” असे वक्तव्य खासदार निलेश लंके यांनी केले आहे. अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी खासदार निलेश लंके यांनी, 2029 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी, पालकमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवत मिश्कील मागणी केल्याने सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top