मुंबई – काल जालन्यात रिपब्लिकन सेनेच्या २८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी, जिथे पाऊसच पडत नाही, तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचं का?, असे खळबळजनक विधान केल्याने त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
खासदार सुनील तटकरे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत, त्यांचा जाहीर शब्दात धिक्कार केला आहे. लोकशाहीत सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे. आमचे स्वर्गीय नेते अजितदादांचं महाराष्ट्रातील योगदान मोठं आहे. दुर्दैवी अपघातानंतर महाराष्ट्र नव्हे, तर देश हळहळला. अशावेळी असं वक्तव्य करणे निंदनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांनी, हयात नसलेल्या व्यक्तीवर बोलून त्यांनी अकलेची दिवाळखोरी दाखवलेली आहे. फक्त आंबेडकर आडनाव असलं म्हणजे अक्कल असतेच असं नाही. अजितदादांवर केलेल्या विधानाची त्यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा संविधानिक पद्धतीने त्यांना भेटतील तिथे विरोध करू’, असा संताप व्यक्त केला आहे.




