राजकीय

भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

हिंगोली – हिंगोलीचे भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांना छातीत त्रास होत असल्याने दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचे निधन झाले. अत्यंत प्रगल्भ आणि निष्कलंक राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती.

राज्यसभा खासदार रामराव वडकुते हे पूर्वी शेळी मेंढी महासंघाचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले.
ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, 2021 मध्ये त्यांची हिंगोलीच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. 7 महिन्या पूर्वी भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले होते.

संबंधित विषय

Scroll to Top