कोल्हापुरात खासगी आराम बसला आग…

कोल्हापूर – आज खासगी आराम बसला अचानक आग लागली. यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

गौरव कुसाळे हे वैभव ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून खाजगी आराम बस वाहतूकीची व्यवसाय करतात. आज सकाळी दहा वाजता निलेश बुधले हे त्यांच्या चालक नाशिक हून आराम बस घेऊन कोल्हापूरात आले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांना उतरवून ते बस पार्किंग करण्यासाठी मार्केट यार्डच्या दिशेने चालले होते. आराम बस लिशा हॉटेल चौकात आल्यानंतर इंजिनमधून दूर येऊ लागला. चालक बुधले यांनी प्रसंगावधान राखत बस हॉटेल  परख जवळ रस्त्याकडेल उभी केली.

बुधले यांनी खाली उतरुन इंजिनची पाहणी केली असता बसच्या एअर कंडीशनच्या वायरिंगमधून धुर येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या कावळा नाका फायर स्टेशनचे अधिकारी कांता बांदेकर, चालक उमेश जगताप, फायरमन उदय शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली. या आगीत बसचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी बघ्यांनी गर्दी केल्याने परिसरातील वाहतूक विस्कळित झाली होती. शाहूपुरी पोलीस ठाण्यासह शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Scroll to Top