हद्दपारी आदेशाचा भंग…शिवाजीनगर पोलिसांत सहा जणांवर गुन्हा

इचलकरंजी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर जॉकी माळगे, प्रफुल्ल जाधव, राहुल शिंदे, गोट्या उर्फ विकास शिंदे, चिल्या उर्फ सुरज माने आणि दर्शन वडर या सहा जणांना १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीसाठी हातकणंगले तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते. मात्र, हद्दपारीच्या आदेशाचा भंग करून हे सहा जण शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरताना आढळून आले. त्यामुळे या सहा जणांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Scroll to Top