अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी करा : मातंग समाजाची मागणी

कोल्हापूर  – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजातील विद्यार्थी, युवक, महिला तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि  सामाजिक विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी  स्टीफन आवळे यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळावे. युवकांना स्वयंरोजगार आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्ज तसेच इतर आर्थिक योजनांचा लाभ तातडीनं उपलब्ध करून द्यावा, महिलांना आर्थिकदृष्ट्‌या सक्षम करण्यासाठी महिला समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी शशिकांत घाटगे,बाजीराव नाईक, प्रशांत आवळे, लक्ष्मण माने, जय घाटगे यांच्यासह मातंग समाजबांधव उपस्थित होते.

Scroll to Top