चंदगड : चंदगड तालुक्यातील शिनोळी एमआयडीसी येथील कार्यरत असणाऱ्या विविध कारखान्यात भूमिपुत्रांपेक्षा कर्नाटकातील कामगारांना जास्त स्थान दिले असल्याचा आरोप केला जातो. अलीकडच्या iकाळात अॅटलस फायरफिल्ड या कारखान्यात कंत्राटी पद्धतीने सेवेत रुजू झालेल्या भूमिपुत्र कामगारांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केलाय. त्यामुळे न्याय मिळावा यासाठी कामगारांनी बुधवारी कामावर न जाता शांततेच्या मार्गाने गेट बंद आंदोलन केले.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या व्यवस्थापनासोबत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कामगार नेत्यांनी चर्चा केली. यावेळी झालेल्या चर्चेत येत्या चार दिवसांत कंपनी व्यवस्थापन संबंधित कामगार ठेकेदार, कामगार प्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावून कामगारांच्या हिताचा योग्य निर्णय घेण्याचे ठरले.
यावेळी कामगार नेते प्रभाकर खांडेकर, चंदगडचे नगराध्यक्ष सुनील काणेकर, सभापती विलास नाईक, पं. स. सदस्य पांडुरंग बेनके, श्रीशैल वाघराळ, मोनाप्पा पाटील, कृष्णा पाटील, विनोद पाटील, सरपंच नितीन पाटील, प्रवीण पाटील, अण्णा पाटील, रोहित करटे आदी उपस्थित


