विविध मागण्यांसाठी लिंगायत समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण

कोल्हापूर – महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा, यासह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंगायत समाजाने साखळी उपोषण सुरु केले आहे. यावेळी लिंगायत बांधवांनी ”आम्ही लिंगायत” नावांच्या टोप्या परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती.

यावेळी लिंगायत बांधवांनी हातात फलक घेवून जोरदार घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला. या आंदोलनात लिंगायत बांधवांसह दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत पाटील, मृत्युजय महाराज सहभागी झाले होते.

या आंदोलनात ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील, नगरसेवक संजय तेलनाडे, प्रशांत शहापुरे, राजशेखर तंबाले,सुभाष महाजन, मनोजकुमार रणदिवे, नितीन पाटील यांच्यासह लिंगायत बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.                      

Scroll to Top