रंकाळा लक्षतिर्थ परिसरात बिबट्याचा वावर? शोधमोहीम सुरू

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील टेंबलाई मंदिरापासून लक्षतीर्थ वसाहतीकडे जाणाऱ्या पाणंदीत बिबट्या दिसल्याचा दावा प्रत्यक्षदर्शी अभिजीत सुतार यांनी केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस, जलदकृती दल आणि वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.सहायक वन संरक्षक प्रियांका दळवी वन पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या असून शोध कार्यात सहभागी झाल्या आहेत.बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाकडून ड्रोनच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. परिसरात नागरिकांची गर्दी होऊ नये, यासाठी पोलिसांकडूनही खबरदारी घेतली जात आहे.दरम्यान, बिबट्या दिसल्याच्या दाव्याची वनविभागाकडून पाहणी व पडताळणी सुरू असून, नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Scroll to Top