संभाजी ब्रिगेडचा संताप… एमपीएससी सचिवांच्या तोंडाला काळ

मुंबई –  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीमुळे राज्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या पेपर फुटीच्या  प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आज संभाजी ब्रिगेडने एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या दालनात प्रवेश करून त्यांच्या तोंडाला काळे फासले.

पेपरफुटीच्या आरोपांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. परीक्षेतील पारदर्शकता, भरती प्रक्रियेवरील विश्वास आणि उमेदवारांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या या आक्रमक भूमिकेमुळे पेपर फुटीचे  प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. दरम्यान सचिवांना काळे फासल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.  

Scroll to Top