चौथी च्या पूर्वप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शियेच्या प्रज्वल घावटे राज्यात दहावा

कोल्हापूर – इयत्ता चौथीच्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत करवीर तालुक्यातील शिये येथील प्रज्वल घावटेने तालुक्यात पहिला तर राज्यात १० क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
या परीक्षेत प्रज्वलने 278 गुण मिळवून हे यश संपादन केले आहे. तो सध्या हनुमाननगर येथील विद्या मंदिर शिये नंबर दोन या शाळेत शिकत आहे. प्रज्वलला शाळेतील शिक्षक आणि आई – वडील यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Scroll to Top