जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीवरून मोठा गोंधळ….

कोल्हापूर – काल पवित्र पोर्टल प्रणालीवरून शिक्षक पद भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिध्द झाली . या जाहिरातीत मराठी माध्यमाची पदे भरण्याऐवजी इंग्रजी माध्यमाची पदं भरण्याची प्रक्रिया राबवण्यात येत असल्याने याविरोधात आज जिल्हा परिषदेच्या कार्यालयात शिक्षकांनी ठिय्या मारला.

जोपर्यंत इंग्रजी माध्यमाची पदं मराठी माध्यमांसाठी करत नाही तोपर्यंत हलणार नसल्याचा पवित्रा शिक्षकांनी घेतला आहे . त्यामुळे शिक्षकांच्या मागण्याची दखल जिल्हा परिषद सदस्यांना आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांना घ्यावी लागली . दरम्यान माझ्याशी चर्चा करा म्हणत प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर या जिल्हा परिषदेच्या पायऱ्यांवरच बसल्यानं एकच गोंधळ उडाला होता. यावेळी शिक्षक, सदस्य आणि अधिकारी यांच्यात तब्बल दोन तास ही चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं .

Scroll to Top