कोल्हापुरातील मार्केटयार्ड जवळील टायर दुकानाला आग

तीन लाखांचं नुकसान

कोल्हापूर – शहरातील मार्केट यार्ड परिसरातील एका दुकानाला गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत तीन लाखाचे नुकसान झाले आहे.

मार्केट यार्ड परिसरातील राजीव गांधी नगर मध्ये राहणारे लियाकत शौकत शेख यांच्या मालकीचे  मार्केट यार्ड परिसरातील वाळू अडड्याजवळ टायर विक्री आणि पंक्चर काढण्याचं दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री या दुकानाला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच कावळा नाका फायर स्टेशनकडील अग्निशामक अधिकारी दस्तगीर मुल्ला यांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासभर परिश्रम घेत ही आग आटोक्यात आणली. या आगीत शेख यांच्या दुकानातील एक कॉम्प्रेसर मशीन, विविध कंपन्यांचे नवीन टायर पंक्चर काढण्याचे साहित्य आगीत जळून खाक झाल्यामुळं सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशामक अधिकारी दस्तगीर मुल्ला, चालक तौफिक सय्यद, मिलिंद गवळी, जवान सुशांत जोंधळे, पुंडलिक माने, तानाजी वडर, सुनील यादव, आशिष माळी यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आगीचे  कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Scroll to Top