अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्य आयोगाची मागणी
नवी दिल्ली – येत्या २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अमेरिकेत बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलीजियस फ्रीडम (USCIRF) च्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या सरकारकडे ही मागणी केली आहे अमेरिकेच्या सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोणत्याही नेत्यांना राजनैतिक शिष्टाचार देऊ नये किंवा त्यांच्याबरोबर कोणत्याही उच्चस्तरीय बैठका घेऊ नये, असेही धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने म्हटले आहे.




