Blog

दुष्काळात ८० लाखांची उधळपट्टी? गोकुळच्या चार शासननियुक्त संचालकांसाठी सरकारी तिजोरीवर भार…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर : राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुसरीकडे विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत असताना गोकुळ दूध संघातील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीच्या समर्थनार्थ सरकारी तिजोरीतून तब्बल ८० लाख रुपये वकिली शुल्कापोटी खर्च करण्यात आल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षात चार शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या नियुक्त्यांच्या समर्थनार्थ न्यायालयीन लढाई लढण्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च केल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

‘एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे आणि दुसरीकडे गोकुळमधील सत्ता स्थापनेच्या वादासाठी सरकारी तिजोरीतील ८० लाख रुपये वकिली शुल्कापोटी खर्च केले जात आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.

गोकुळमधील सत्तासंघर्ष आता केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित न राहता सरकारी खर्चाच्या मुद्द्यावरूनही चर्चेत आला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

संबंधित विषय

Scroll to Top