नवी दिल्ली – वेलिंग्टनच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी टीम इंडियाने धावांचा नवा इतिहास रचला आहे. भारताने ९ बाद ७२० धावांवर पहिला डाव घोषित करत परदेशातील आपली सर्वोच्च कसोटी धावसंख्या नोंदवली आहे.
या सामन्यात ऋषभ पंतची तुफानी फटकेबाजी आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यामुळे एकाच दिवसात टीम इंडियासह पंतच्या नावावर विक्रम नोंदवला आहे.
भारतीय क्रिकेट संघाची ९ बाद ७२० ही धावसंख्या कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च तिसरी सर्वोच्च, तर परदेशातील सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे, न्यूझीलंडविरुद्ध तसेच न्यूझीलंडच्या भूमीवर कोणत्याही संघाने केलेली ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी १९९५ मध्ये याच मैदानावर वेस्ट इंडिजने न्यूझीलंडविरुद्ध ५ बाद ६६० धावा केल्या होत्या, तर २०१९ मध्ये हॅमिल्टन येथे न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध ६ बाद ७१५ धावा उभारल्या होत्या. हे दोन्ही विक्रम भारताने मोडीत काढले आहेत.




