क्रीडा

वर्षानुवर्षे जपलेला क्रिकेटचा ठेवा आता तुमच्या स्वाधीन करतोय…: क्रिकेटचा देव भावूक

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

सचिन तेंडुलकरने आपल्या २५ बॅट आणि अनेक वस्तू संग्रहालयाला दिल्या भेट

मुंबई – ‘माझ्या किट बॅगेतील बॅट, ग्लव्हज, हेल्मेट, पॅड आणि कॅप अशा सगळ्या गोष्टी मी जीवापाड जपल्या आहेत. वर्षानुवर्षे जपलेला हा ठेवा, आता तुमच्या स्वाधीन करत असल्याचे म्हणत भारतरत्न सचिन तेंडुलकर हे भावूक झाले. सोमवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या शरद पवार क्रिकेट संग्रहालयाला त्यांनी २५ बॅट आणि काही वस्तू भेट म्हणून दिल्या. यावेळी ते बोलत होते.
१६ नोव्हेंबर २०१३ रोजी सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावेळी त्यांनी २० मिनिटाचं भाषण केलं होतं त्यावेळी त्यांनी भाषणाचे मुद्दे ज्या कागदावर टिपून ठेवले होते, तो कागदही या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे.
‘माझे क्रिकेट किट हा माझ्या शरीराचा एक भागच आहे. त्यातील वस्तू आणि बॅट आज मी तुम्हाला भेट म्हणून देत आहे. असे समजा की, मी माझ्या शरीराचा एक भागच सुपूर्द करत आहे. त्याला जपा…’, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

“नव्वदच्या दशकात तंबाखू, सिगारेट आणि मद्य बनवणाऱ्या कंपन्या बॅटसाठी प्रायोजकत्व देत होत्या. मला मात्र त्यांच्या जाहिरातीत भाग घेऊन चुकीचा संदेश द्यायचा नव्हता. त्यामुळे मी काही महिने कोणत्याही प्रायोजकाविना बॅट वापरली. म्हणून त्या काळात तुम्हाला माझ्या बॅटवर स्टिकर दिसले नाही,” असे सचिन यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी सचिन यांची पत्नी अंजली, मुलगी सारा, मुलगा अर्जुन आणि कुटुंबीय उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top