ब्रेकिंग न्यूज
क्रीडा

कोल्हापुरात शासकीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न… १२०० स्केटींगपटूंचा सहभाग

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – सेवा संकल्प अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्हा आणि महानगरपालिका स्तरीय शासकीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, प्रशासनाधिकारी जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली.

 आयसोलेशन हॉस्पिटल समोरील रोड आणि विबग्योर स्कुल, गडमुडशिंगी येथे ही स्पर्धा पार पडली. इन लाईन स्कॉड आणि रिंग रेस या दोन प्रकारात ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अकरा, चौदा, सतरा आणि एकोणीस वयोगटातील बाराशेहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी पंच म्हणून ऐश्वर्या बिरजे, सचिन नाईक, तेजस्विनी कदम, अजय शिलेदार, धनश्री कदम, सुहास कारेकर, जयराम जाधव, विनायक साळोखे, रोहन बंगडे, विरश्री कदम, भास्कर कदम, सुषमा पाटोळे यांनी काम पाहिले. यावेळी अॅडव्होकेट आचल रणदिवे, तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, राज्य स्केटिंग संघटना उपाध्यक्ष प्रा. डॉ. महेश कदम, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव आदी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top