कोल्हापूर : टेबल टेनिस असोसिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या वतीने पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंचा सत्कार समारंभ असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात निवड झालेल्या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अधिकृत क्रीडा टी-शर्ट किटचे अनावरण करून खेळाडूंना किटचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते क्रीडा किटचे अनावरण करण्यात आले. यावेळी खेळाडूंना किट प्रदान करून त्यांच्या पुढील स्पर्धात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या क्रीडा प्रवासात मोलाचे योगदान देण्यासाठी सचिन सिल्वर, कोल्हापूर आणि अमर – किंग ऑफ व्हेज यांचे असोसिएशनच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
राज्य स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे :
११ वर्षांखालील मुली : आरोही श्री श्री माळ, इरा भोसले, श्रीजा कोगनोळी, गुंजल जगताप.
११ वर्षांखालील मुले : शुभंकर जाधव, संयम चव्हाण, निरंजन पाटील, रणवीर जाधव.
१३ वर्षांखालील मुली : समृद्धी मनवेकर, तनवी भिसे, आरोही श्री श्री माळ, जिजा भोसले.
१३ वर्षांखालील मुले : पुष्पम शहा, राजवीर गायकवाड, शुभंकर जाधव, रणवीर जाधव.
१५ वर्षांखालील मुली : गीत जगताप, समृद्धी मनवेकर, अवनी माने, तनवी भिसे.
१५ वर्षांखालील मुले : संकल्प बांदिवडेकर, जुनेद मगदूम, राजवीर साळोखे, अर्णव माने.
१७ वर्षांखालील मुली : गीत जगताप, सिद्धी पाटील, जानवी भोसले, अवनी माने.
१७ वर्षांखालील मुले : संकल्प बांदिवडेकर, मृथेय कळमकर, जुनेद मगदूम, वरद सांगावकर.
१९ वर्षांखालील मुली : अनन्या जोशी, निहाली पाटील, सिद्धी पाटील, निहारिका कुलकर्णी.
१९ वर्षांखालील मुले : पिनाक पाटकर, ईशान माने, मृथेय कळमकर, शिवम गुप्ता.
ओपन महिला गट : अनन्या जोशी, निहाली पाटील, मधुरा शेंदुरे, ऋजुता भुरके, जानवी भोसले.
ओपन पुरुष गट : ऋषिकेश नलवडे, अनिश सोनटक्के, पिनाक पाटकर, शिवम गुप्ता, ओमकार गुरव.
या संघासोबत प्रशिक्षक म्हणून विवेक कुंभार व शिवतेज खराडे, तर संघ व्यवस्थापक म्हणून सुरेश देशपांडे काम पाहणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील टेबल टेनिस खेळाडूंना अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावर यशस्वी खेळाडू घडविणे हा असोसिएशनचा मुख्य उद्देश आहे. आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करावी, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून असोसिएशनचे प्रायोजक सचिन सिल्वरचे सचिन चव्हाण, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव संग्राम चव्हाण, जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे खजिनदार शिरीष देशपांडे, तसेच असोसिएशनचे सदस्य सचिन कोगनोळी, अमेय नाईक, नलवडे, अजय देशपांडे व राजेंद्र रायकर उपस्थित होते.




