मुंबई – भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने इंस्टाग्रामवरून कर्णधार पदाबाबत खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने अचानक कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली सुवर्णपदक जिंकले आणि त्यानंतर देशात परतलेल्या संघात बरीच खलबते झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हरमनप्रीत कौर, मुख्य प्रशिक्षक अमोल मुझूमदार व उप कर्णधार स्मृती मानधना यांच्यासोबत संघाच्या कामगिरीचा आढावा घेणारी बैठक घेतली. त्यात हरमनप्रीतच्या कर्णधारपदाला धोका नसल्याचे म्हटले गेले, परंतु तिने सोशल मीडियावरून भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले आहे.
हरमनप्रीतने म्हटले आहे की,”आज मी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपदावरून पायउतार होत आहे. हा निर्णय घेणे सोपे नव्हते. यामध्ये वर्षांनुवर्षांच्या आठवणी, भावना, त्याग आणि असे क्षण सामावले आहेत, जे माझ्या उर्वरित आयुष्यात कायम माझ्यासोबत राहतील.”



