इतर

सतेज कृषी व पशू प्रदर्शन यंदा ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत… आज झालं भूमिपूजन

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्रातले सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सतेज कृषी आणि पशू प्रदर्शनाची सर्वांना उत्सुकता असते. आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे प्रदर्शन दरवर्षी भरवले जाते. प्रदर्शनाचे यंदाचे हे आठवे वर्ष असून कळंबा रोडवरील तपोवन मैदानावर ४ ते ७ डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन होणार आहे.

या प्रदर्शनाचे आयोजन डॉ . डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. याचे भूमिपूजन कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रदर्शनात देश – विदेशातील विविध नामांकित कृषी कंपन्यांचा समावेश असणार आहे. याचबरोबर पशुपक्षी दालन, शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, विविध कंपन्यांची उत्पादने आणि शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान, नवीन अद्ययावत मशिनरी यांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बचत गटांचे स्टॉल, लहान मुलांसाठी अम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे. यासाठी महालक्ष्मी बिझनेस ग्रुप, सागर भालेकर सरूडकर, संजय घोडावत ग्रुपचे प्रायोजकत्व लाभले आहे.

या भूमिपूजन प्रसंगी माजी उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक दुर्वास बापू कदम, सुनील मोदी, प्रतापसिंह जाधव, प्रशांत खेडकर, माजी नगरसेविका प्रतीक्षा पाटील  यांच्यासह संतोष जरग, राजेश घाटगे, संदीप बिरांजे, विजय कांबळे, विनोद पाटील, धीरज पाटील, स्काय स्टार इव्हेंट्सचे स्वप्निल सावंत, प्रफुल्ल काटे आदी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top