कृषी

यंदा देशातील कांदा उत्पादनात घट होण्याची शक्यता : केंद्र सरकारचा अंदाज

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

नाशिक – देशासह इतर राज्यातील हवामानात झालेल्या बदलामुळे तसेच पावसाने ओढ दिल्याने यंदा कांदा उत्पादनात घट होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा देशातील कांदा उत्पादनात ६.०८ टक्क्यांची घट होण्याची शक्यता केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील नाशिकसह इतर सात जिल्हे तसेच कर्नाटक आणि इतर प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमधील लागवड क्षेत्र, हवामानातील बदल, पाण्याची उपलब्धता आणि पीक उत्पादकतेचा परिणाम कांदा उत्पादनावर झाला आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या २०२५-२६ च्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार देशात २८८.९६ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादन अपेक्षित आहे.गतवर्षी ३०७.६७ लाख टन उत्पादन झाले होते. त्यामुळे यंदा उत्पादनात सुमारे १८.७१ लाख टनांची घट होण्याची शक्यता आहे.
देशाची वार्षिक सुमारे २१० लाख टनांची गरज लक्षात घेता अपेक्षित उत्पादन गरजेपेक्षा ७८.९६ लाख टनांनी अधिक आहे. त्यामुळे उत्पादनातील घट होऊनही देशांतर्गत मागणी भागविण्यासह निर्यातीसाठीही संधी कायम राहण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय

Scroll to Top