आंदोलन

कोल्हापूरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्या पोस्टरला मारले  जोडे…आंदोलकांचा संताप

pnigave 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबईतील पत्रकार बैठकीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ‘बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह’ या पुस्तकाची पाने फाडली. या प्रकारानंतर राज्यभरातील काँग्रेस कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कमिटीसमोर आज आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी शायना एनसी यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध केला.

यावेळी पुस्तक फाडताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी शायना एनसी यांच्यासह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध केला. हातात निषेधाचे फलक, शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. महापालिकेतील विरोधी पक्ष नेते राजेश लाटकर यांनी पुस्तकाची पाने फाडण्याच्या कृत्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला.

पुस्तकाचे पूर्ण वाचन न करता त्यातील काही संदर्भाचा आधार घेऊन पुस्तकाची पाने फाडण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, सोनिया गांधी यांच्या पुस्तकाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे भाजप आणि शिंदे गटाला पोटशूळ उठलाय, अशा शब्दांत माजी नगरसेविका भारती पोवार यांनी टीका केली आहे.

या आंदोलनात जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, महापालिकेतील गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेविका ऋग्वेदा माने, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, बयाजी शेळके, रंगराव देवणे, उदय पोवार, राजदीप भोसले, विनायक घोरपडे, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर, युवराज गवळी, दीपक थोरात, अक्षय शेळके, तानाजी लांडगे, संजय पटकारे, उज्वला चौगले, रेश्मा चांदणे, अलका सलगर, शितल पाटील, रणवीर जाधव, उदय फाळके, संदीप बिरंजे, यशवंत थोरवत, अरुण कदम, डॉ. प्रमोद बुलबुले, कपिल घाडगे, संग्राम गायकवाड, राणी खंडागळे, आकाश शेलार, भैय्या शेटके, प्रथमेश कांबळे, विजयानंद पोळ यांनी सहभाग घेतला होता.

संबंधित विषय

Scroll to Top