आंदोलन

कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाची बीजे रोवली गेलीयत, 2029 मध्ये सत्ता परिवर्तन होणार…आ. सतेज पाटील

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळ दुध संघाच्या घडामोडीतून कोल्हापूर जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या सत्ता परिवर्तनाची बीजे रोवली गेली आहेत . 2029 मध्ये या महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार आहे. या परिवर्तनाची सुरुवात कोल्हापूरच्या भूमीतून झालेली आहे. कोल्हापूरकरांनी याची सुरुवात केली आहे. असा विश्वास आ. सतेज पाटील यांनी व्यक्त केला.संघर्ष मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.

आ. सतेज पाटील म्हणाले कि, राज्य सरकारने सहकारात आणलेला नवीन कायदा हा फक्त गोकुळला लागू होणार नाही तर राज्यातील सर्व सहकार क्षेत्राला लागू होणार आहे. एकूणच या राज्यातील सहकाराची वाटचाल एनडीडीबीकडे सुरू झाली आहे. कोल्हापूर हा सहकाराचा जिल्हा आहे त्यामुळे आम्ही न्यायालयाकडूनही योग्य त्या न्यायाची अपेक्षा करतो आहे .उद्याच्या बैठकीत कोरमचा विषय येत नाही फक्त चेअरमन निवडीसाठी ही बैठक आहे .थोडी तरी यामध्ये सुधारणा करावी असं बारा संचालकांना वाटत असेल तर त्यांनी उपस्थित रहावं, असं आवाहन त्यांनी केलं.
आमचं बहुमत असताना देखील मी पुढे पाऊल टाकलं होतं. निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे सगळं विसरून साडेपाच लाख शेतकऱ्यांसाठी एकत्र येऊन काम करावे, अशी माझी भूमिका होती. तरीही राज्य सरकारने असा अध्यादेश काढला, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

संबंधित विषय

Scroll to Top