आंदोलन

आम्ही दोन पावले मागे आलो आहे, तुम्ही दोन पावले पुढे या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र  करू : राजू शेट्टी यांचा इशारा

pnigave अपडेट: 5 November 2026, 4:12 PM 1 मिनिटे वाचन
शेअर करा

महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोल्हापूर – गेल्या तीन दिवसांपासून ऊस दरासाठी शेतकरी पुणे – बेंगलोर महामार्गावर ठिय्या मारून आहेत. तरीही ऊस दराबाबत तोडगा निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.   यावर राजू शेट्टी यांनी, ऊसासाठी कारखान्यांनी ३ हजार ८५० रूपयांचा प्रस्ताव दिला आहे आणि कालच या साखर कारखान्यांनी ५ हजार ५२५ रूपये क्विंटलने साखर विकली आहे.  मग प्रति क्विंटल १ हजार ६७५ रूपये कुणाच्या घशात जाणार ?, असा सवाल त्यांनी केला आहे.  या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

 ‘‘यंदाच्या हंगामासाठी विना कपात पहिली उचल ४५०० ऐवजी ४२०० द्या. आम्ही दोन पावले मागे आलो आहे, तुम्ही दोन पावले पुढे या, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होईल’’, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top