कोल्हापूर – ऊस दरासाठी कालपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी किणी टोलनाक्यावर रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे.. या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून काल रात्रभर शेतकऱ्यांनी रस्त्यावर झोपून रात्र काढली आणि आज पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनासाठी ठिकठिकाणाहून मदत दाखल होत आहे. यावेळी पलूस तालुक्यातील भिलवडी येथील विजय चोपडे यांनी आंदोलनाला पाठिंबा देत २०० डझन केळी दिली आहे.
कारखानदारांनो आजच निर्णय द्या नाहीतर उद्या सकाळपासून तुमचे वाईट दिवस चालू होतील, असा इशारा काल राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यानुसार आंदोलन तीव्र करण्यात आले आहे.




