गावातून होणारी उसाची वाहतूक पुर्णपणे बंद करा : राजू शेट्टी
कोल्हापूर – ऊस दरासाठी आज शेतकरी किणी टोल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. त्यानुसार शेतकरी एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
यावेळी राजू शेट्टी यांनी फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटले आहे की, शेतकऱ्यांनो ऊस दराचं आंदोलन यशस्वी करायचं असेल तर पुणे – बेंगलोर महामार्ग तर बेमुदत रोखायचा आहेच पण सरकार व कारखानदारांना गुडघे टेकायला लावायचे असतील तर सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील गावातून होणारी उसाची वाहतूकही पुर्णपणे बंद करायची आहे.




