आंदोलन

संघर्ष मोर्चाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी… नेटकं नियोजन…

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघर्ष मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लाखो दूध उत्पादक शेतकरी सहभागी होणार असल्याने संयोजकांनी नेटके नियोजन केले होते. दसरा चौक व्हीनस कॉर्नर, असेंबली रोड, जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरात ठिकठिकाणी स्टॉल मांडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. काही ठिकाणी मोर्चातील सहभागी लोकांसाठी नाश्ताचे वाटप करण्यात आले.

मोर्चाच्या मार्गावर पडलेल्या पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या यावेळी त्वरित उचलून एकत्र करत स्वच्छता करण्यात आली. दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या संपूर्ण मोर्चाच्या मार्गावर जिल्हा परिषद सदस्य सोनाली सावंत यांनी लक्षवेधी फलक उभारून राज्य सरकारचा निषेध नोंदवला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मान्यवरांची भाषणे लोकांना ऐकता यावीत, यासाठी एलईडी स्क्रीन उभारून सभेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. सभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा मंडप उभारण्यात आला होता. मात्र तो मंडप अपुरा पडल्याने मंडपाच्या बाहेर उद्योग भवन ते त्रिवेणी हॉटेल या मार्गावर देखील मोर्चातील सहभागी लोक रस्त्यावर बसून एस न्यूजचे थेट प्रक्षेपण पाहत होते.

संबंधित विषय

Scroll to Top