आंदोलन

उद्यापासून राज्यभरातील न्यायालयीन कर्मचारी जाणार संपावर

pnigave 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – राज्यातील वर्ग तीनच्या न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी प्रमाणे वेतन देण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने २२ महिन्यांपूर्वी दिला आहे. मात्र अद्यापही राज्य सरकारने न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू केलेली नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यासाठी उद्या, मंगळवारपासून राज्यातील जवळपास वर्ग ३ चे ३४०० न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. कोल्हापुरातील न्यायालयीन कर्मचारी या संपात सहभागी होणार असल्याचे कोल्हापूर जिल्हा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले.

न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठी सनदशीर मार्गाने लढा सुरू केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सुधारित वेतनश्रेणी लागू करावी. यासाठी उद्यापासून आपण बेमुदत संपावर जाणार असल्याचे स्टेनो असोसिएशनच्या अध्यक्षा शीला काशीद यांनी सांगितले. तसेच न्यायालयातील बेलीफ देखील या संपात उतरणार आहेत. या संपामुळे न्यायालयीन कामकाज प्रभावित होण्याची शक्यता आहे.

संबंधित विषय

Scroll to Top