इचलकरंजी – शहराजवळच्या कबनूरमध्ये एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ले करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. रस्त्यावरून येणाऱ्या – जाणाऱ्या नागरिकांना अचानक लक्ष्य करत या कुत्र्याने आतापर्यंत १५ ते १६ जणांचा चावा घेतला आहे. जखमींवर इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महानगरपालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणेने तातडीने या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.



