सहकार

चुयेकरांना थांबवायचा प्रयत्न होत असेल तर कोल्हापूरची जनता हे मान्य करणार नाही : आ. सतेज पाटील

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळ दुध संघामध्ये अध्यक्ष पदासाठी बैठक होत आहे. या पदासाठी स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत चुयेकर यांच्या नावाची घोषणा आ. सतेज पाटील यांनी समविचारी आघाडीकडून केली आहे. यावर बोलताना आ. सतेज पाटील यांनी, तिकडचे कोण येणार नाही आणि इकडचे कोण जाणार नाही. बैठकीच्या सुरुवातीला आम्ही महायुतीच्या संचालकांची वाट बघणार आहोत. साडेपाच लाख शेतकऱ्यांचा रोष हे बारा संचालक घेणार नाहीत कारण बहुमत आमच्या बाजूने आहे. आनंदराव चुयेकरांचा मुलगा अध्यक्ष होत असेल आणि परत त्यांना थांबवायचा प्रयत्न होत असेल तर कोल्हापूरची जनता हे मान्य करणार नाही, असा टोला त्यांनी महायुतीला लगावला आहे.

संबंधित विषय

Scroll to Top