कोल्हापूर – गोकुळ निवडणुकीच्या प्रचारपत्रिकेवर महायुतीकडून स्व. आनंदराव चुयेकर यांचा फोटो वापरला जातो, मग मुलाला चेअरमन करताना राजकारण कशासाठी आणताय, असा सवाल माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी उपस्थित केला आहे.
गोकुळ ही प्रत्येकाच्या हृदयातील संस्था आहे. हा विचार करून महायुतीचे संचालक येतील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी शेतकऱ्यांपेक्षा राजकारणाला जास्त महत्त्व दिले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



