सहकार

शेतकऱ्यांनी आमच्या बाजूने न्याय दिलाय यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे : आ. सतेज पाटील

एस न्यूज प्रतिनिधी अपडेट: 30 October 2026, 11:54 AM 2 मिनिटे वाचन
शेअर करा

प्रशासकांना पत्र सुपूर्द करणार : आ. सतेज पाटील

कोल्हापूर – गोकुळ दुध संघाच्या  अध्यक्ष पदासाठी आज सकाळपासून वेगवेळ्या घडामोडी घडल्या आहेत. यावर  आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, ज्यांचे जास्त संचालक निवडून आले आहेत त्यांचे मैंडेट आहेत. ते तुम्ही अमान्य कसं करता. ज्याचं बहुमत आहे त्यांचीच सत्ता असते. आम्ही प्रशासकांना पत्र देणार आहोत. बहुमत आमचं आहे तर कारभार आमच्याकडे सोपवावा. साडेपाच लाख शेतकऱ्यांनी आम्हाला बहुमत देवून  आमच्या बाजूने न्याय दिला आहे हे सर्व जगाला माहित आहे यापेक्षा आणखी काय पुरावा पाहिजे. आता तांत्रिक मुद्द्यावर थांबवणे हे कितपत योग्य आहे. त्यामुळे आम्ही प्रशासकांना पत्र सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्हाला अपेक्षा होती की, महायुतीचे संचालक उपस्थित राहतील पण ते आले नाहीत त्यामुळे आजचा आमचा काळा दिवस मानावा लागेल असे म्हणत ते पुढे म्हणाले कि, आम्ही कायद्याचा सल्ला घेतला आहे आमचं बहुमत असल्याने आमच्या संचालकांनी त्याच बैठकीत निर्णय घेऊन शशिकांत चुयेकर यांना अध्यक्ष केले आहे. प्रशासकांच्या काळात हा दूध संघ बुडवायचा आहे का? आम्ही प्रशासकांना पत्र देणार आहोत आमचं बहुमत असल्याने तुम्ही आम्हाला कारभार सुपूर्द करा असं सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात निवडणुकीबाबत  वेगळाच पायंडा पडत आहे. नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्ष पदासाठी  मीच  नावाचं पाकीट दिलं होतं त्यावेळी मी जातीयवादी नव्हतो का ? हा छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी  जिल्हा आहे. यामध्ये जातीवाद आणला नाही पाहिजे ज्यांनी त्यांची कोंडी केली आहे  त्यांना त्यांनी बोलायला पाहिजे होतं, असा टोला त्यांनी यावेळी मंत्री हसन मुश्रीफांना लगावला.

संबंधित विषय

Scroll to Top