कोल्हापूर – गोकुळमध्ये अध्यक्ष पदासाठी नवनिर्वाचित संचालकांची बैठक बोलावण्यात आली आहे. याला महायुतीच्या संचालकांनी गैरहजेरी लावल्याने उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी, गोकुळ मध्ये ज्या पद्धतीने कायदे नसताना नवीन कायदे तयार करायचे आणि लोकशाही नष्ट करायचं काम सुरु आहे. असं आयत्यावेळी कायदे बदलता येत नाहीत. सहकार कायदा हा लोकशाहीवादी आहे. शासनाने यामध्ये कोणताही हस्तक्षेप करायचा नाही हे घटनेत आहे. सर्व जनता नाराज असताना ही लोकं असं डेरिंग करताय हे बरोबर नाही, असा रोष त्यांनी व्यक्त केला आहे.



