नवी दिल्ली – तब्बल आठ वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मानहानी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून खटला सुरु होता. या खटल्यातून सुलतानपूर न्यायालयाने राहुल गांधींची निर्दोष मुक्तता केली आहे.
सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व भाजपा नेते विजय मिश्रा यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. २०१८ सालच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांआधी बंगळुरूमध्ये घेतलेल्या प्रचारसभेदरम्यान राहुल गांधींनी आपल्या भाषणात अमित शाहांचा अवमानास्पद उल्लेख केल्याचा दावा त्यांनी केला होता.




