ब्रेकिंग न्यूज
सहकार

तांत्रिक मुद्द्यांवर न जाता लोकांनी दिलेल्या बहुमताचा विचार करा : आ. सतेज पाटील

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळच्या निवडणूकीत तेरा जागा जिंकत समविचारी आघाडीनं बहुमताची बाजी मारली आहे. परंतु गोकुळचा अध्यक्ष  निवडीसाठी 14 संचालकांचा  कोरम पूर्ण करणे आवश्यक आहे.  यामुळे अध्यक्ष पदाबाबत उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे. यावर आ. सतेज पाटील यांनी, सहकारामध्ये जर आदर्श ठेवायचा असेल तर आपण अध्यक्ष निवडीच्या बैठकीला उपस्थित राहून तांत्रिक मुद्द्यांवर न जाता लोकांनी दिलेल्या बहुमताचा विचार करावा, असे महायुतीच्या  संचालकांना उद्देशून म्हटले आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

आ. सतेज पाटील म्हणाले कि, सगळ्यांनी मिळून एकोप्याने संस्था वाढवू, पुन्हा निवडणुकीला सामोरे जायला लागू नये, एवढीच अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोकुळचा निकाल लागला असून बहुमत आमचं आलं आहे. एका मताने सुद्धा माणूस जिंकू शकतो, असंच असतं., सहकारात काम करणारे मुश्रीफ साहेब असतील, कोरे साहेब असतील उद्या याचा महाराष्ट्रामध्ये परिणाम दिसू शकतो, त्यामुळे मला खात्री आहे की 29 तारखेच्या बैठकीमध्ये सगळेजण उपस्थित राहून बैठकीचा फोरम पूर्ण करतील.

संबंधित विषय

Scroll to Top