ब्रेकिंग न्यूज
इतर

कोल्हापुरात ‘या’ दिवशी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – पर्यावरणावर आधारीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 27 आणि 28 ऑक्टोबरला  कोल्हापुरात आयोजन करण्यात येणार आहे. किर्लोस्कर सामाजिक बांधिलकी उपक्रमाचे अधिकारी शरद आजगेकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.

सायबर महाविद्यालयाच्या राधाबाई शिंदे सभागृहात हा महोत्सव होणार असून महोत्सवाचे उ‌द्घाटन उद्योजिका मोनिका मोहिते, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीचे साईट लीडर सुरेश मगदूम, किर्लोस्करचे HR प्रमुख हरीश सायवे, आणि सायबरचे संचालक डॉ. आर. के. टेलर यांच्या उपस्थित होणार आहे.

या दोन दिवशीय महोत्सवात पर्यावरणावर आधारित विविध लघुपटांचे  सादरीकरण केले जाणार आहे. महोत्सवात  विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. शिंपा शर्मा या युवकांना मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवावेळी पर्यावरणीय योगदानाबद्दल माण तालुक्यातील रोहित बनसोडे, रक्षिता बनसोडे आणि योगेश फोंडे यांचा डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश शर्मा यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.

या पत्रकार बैठकीला  लक्ष्मी फाउंडेशनचे अध्यक्ष विनायक देसाई, सायबर संस्थेचे डॉ. दीपक भोसले उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top