ब्रेकिंग न्यूज
क्राईम

कोडोलीत गुटखा मावा विकणाऱ्यांवर कोडोली पोलिसांची कारवाई

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील  अंबाबाई मंदिराजवळ एका पान दुकानात अनिकेत अविनाश केकरे हा तरुण मावा विकत असल्याची माहिती कोडोली पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे कोडोली पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल सुहास वायदंडे यांनी पान दुकानावर छापा टाकून कारवाई केली. यावेळी केकरे याच्याकडून ३ हजार ९०० रुपये रोख रक्कम आणि बाराशे रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला आहे.

त्याचबरोबर वारणानगरमधील चौकातील शाहरुख सरदार नायकवडी या मावा विक्री करणाऱ्या तरुणावर कारवाई करत पोलिसांनी ७ हजार शंभर रुपये रोख आणि नऊशे रुपये किंमतीचा मावा जप्त केला. तसेच कोडोलीमधील नरसोबा ओढ्याजवळ एका दुचाकीवरुन गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी सुनील मुरलीधर पाटील याला दुचाकी आणि साडेबारा हजार रुपयांच्या गुटख्यासह ताब्यात घेतले. कोडोली पोलिसांनी एकाच वेळी तीन ठिकाणी कारवाई करुन जप्त केलेला मावा आणि गुटखा नष्ट केला. तसेच त्यांच्यावर सुगंधी सुपारी आणि गुटखाबंदी अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. एकाच दिवशी तीन ठिकाणी कारवाई झाल्याने लपून छपून गुटखा, मावा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

संबंधित विषय

Scroll to Top