ब्रेकिंग न्यूज
सहकार

कोल्हापूरात डेअरी इंडस्ट्री एक्स्पोला सुरुवात…

एस न्यूज प्रतिनिधी 2 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर –  बेनीसन मिडिया आणि गोकुळ दूध संघ यांच्यावतीने दहाव्या “डेअरी इंडस्ट्री एक्सपो २०२६” या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मार्केट यार्डमधील रामकृष्ण लॉनमध्ये अठरा ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. चितळे ग्रुपचे मालक गिरीश चितळे यांच्या हस्ते या एक्स्पोचे उद्घाटन करण्यात आला. या प्रदर्शनात दुग्ध व्यवसायाशी संबंधित सत्तरहुन अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यावतीने दुग्धजन्य पदार्थ, पशुखाद्य, त्याच बरोबर दुग्ध व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री आदींचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पशु प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आले आहे. आज दिवसभर शेतकरी कार्यशाळा पार पडली. यामध्ये दुभत्या जनावरांमधील वंधत्व कमी करणे, या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केले. उद्या सतरा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता दूध व्यवसाय परिषद होणार आहे. यामध्ये गोकुळ दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले हे भारतीय उद्योग व्यवसायाचे भविष्य, आव्हानं, संधी आणि पुढील वाटचाल याविषयावर, आय.एफ चे सचिन जोशी हे दुग्धोत्पादक पशुधनाच्या जनुक शास्त्राचे भवितव्य: जीनोमिक्स प्रजनन तंत्रज्ञान आणि उत्पादकता, या विषयावर, बिहार पशुविज्ञान विद्यापीठाचे डॉक्टर इंद्रजीत सिंग हे दुग्ध क्रांती टू पॉईंट ओ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी तीन वाजता शेतकरी कार्यशाळेत फलटणचे डॉक्टर शांताराम गायकवाड यांचे एकात्मिक दुग्ध व्यवसाय मॉडेल या विषयावर, तर नफ्यासाठी पशुखाद्य चारा आणि सायलेज व्यवस्थापन यावर डॉक्टर व्ही डी पाटील, डॉक्टर शैलेश मदने हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर गोकुळचे किरण जोशी आणि भरत लाड यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय दुग्ध उद्योगासमोरील संधी, आव्हाने आणि भारतीय दुग्ध तंत्रज्ञानाची भूमिका याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. अठरा ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता शेतकरी कार्यशाळा होणार आहे. यामध्ये दुग्ध पदार्थाची व्याप्ती यावर ज्ञानसुंदरी संस्थेचे नामदेव सांडभोर, भारत डेअरीचे चिराग मेहता हे मार्गदर्शन करणार आहेत तर शेखर काळे हे आईस्क्रीम पदार्थाची व्याप्ती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. दूध व्यवसायाशी संबंधित सर्व घटकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

या उद्घाटन प्रसंगी गोकुळच्या प्रशासकीय मंडळाचे प्रदीप मालगावे, संग्राम फडतरे, शशिकांत पाटील, अमोल नलावडे, शेखर मुंदडा, डॉक्टर एन एम मार्कडेय, डॉक्टर योगेश गोडबोले, डॉक्टर सचिन डोके, डॉक्टर हरी कुमार, किरीट मेहता यांच्यासह शेतकरी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

संबंधित विषय

Scroll to Top