ब्रेकिंग न्यूज
सहकार

गोकुळ निवडणुकीमध्ये महायुतीच्या नेत्यांना क्रॉस व्होटिंगची भीती…

एस न्यूज प्रतिनिधी 1 मिनिटे वाचन
शेअर करा

कोल्हापूर – गोकुळ निवडणुकीमध्ये सध्या रंगत यायला सुरुवात झाली आहे. अशा वेळी महायुतीच्या नेत्यांना क्रॉस व्होटिंगची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे ठरावधारकांना सहलीवर पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सुरुवातीला गोकुळच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून मोठा राडा झाल्यानंतर आता ठरावधारकांना एकत्र ठेवण्यासाठी वेगवेगळा फंडा वापरण्याची वेळ नेत्यांवर आली आहे. त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
तसेच या निवडणुकीत ठरावधारकांच्या शपथ घेण्याच्या सूचना महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पॅनल टू पॅनल मतदान करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. यावर प्रचार सभेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी , प्रचंड मताधिक्य मिळण्याच्या दृष्टीने आम्ही शपथ घेऊन एकत्र आलेलो आहोत आणि मी सगळ्या नेत्यांना विनंती करणार आहे, या निवडणुकीचं मर्म काय आहे? आपापले निवडणुकीतले मतदार एकत्र करणं सगळ्यांनी, त्याच्या शपथा घेणं, पॅनल टू पॅनल मतदान करायला लावणं म्हणजे 90 टक्के महायुतीला मत पडणं असा त्याचा अर्थ आहे, असे म्हणाले आहेत.

संबंधित विषय

Scroll to Top