कोल्हापूर – विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील 99.94 टक्के मतदार अंतिम यादीमध्ये वर्ग करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे.
उर्वरित कामास गती देऊन प्रलंबित कामकाज त्वरित पूर्ण करावे. मतदारांनी बिनचूक मतदान कसे करावे यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत जनजागृती करावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेंतर्गत कामकाज तसेच महाराष्ट्र विधानपरिषद पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, अतिरिक्त आयुक्त महसूल डॉ. स्वाती देशमुख, अपर जिल्हाधिकारी अजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोहिनी चव्हाण, उपजिल्हाधिकारी महसूल संपत खिलारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेसाठी नियुक्त अधिकारी उपस्थित होते.



