थकबाकीदार आणि अनधिकृत नळ कनेक्शनधारकांविरोधात महापालिकेची कारवाई

कोल्हापूर  – महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाने शहरातील विक्रमनगर परिसरात मोठ्या थकबाकीदारांविरोधात सोमवारी कारवाई केली. यावेळी एकूण सहा थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले संबंधित थकबाकीदारांकडून २ लाख ९५ हजार ८४७ रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या आदेशानुसार पथक प्रमुख बाळासाहेब पठाण, संजय चौगुले, काका बनसोडे, निरंजन चव्हाण, शाखा अभियंता सुनील भाईक, कनिष्ठ लिपिक दादाभाऊ पाटोळे, अरुण प्रभावळे, मीटर रीडर गणेश देसाई आणि कोमल भोसले आदिंनी ही कारवाई केली आहे.

Scroll to Top