कोल्हापूर – जिल्ह्यातील ज्या मतदारांची मतदार यादीशी विसंगती आहे तसेच २००२ च्या मतदारयादीशी मॅपिंग झालेलं नाही अशा मतदारांची सुनावणी २८ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.
त्यानुसार मॅपिंग न झालेल्या १ लाख १५ हजार ९४६ आणि विसंगती आढळलेल्या १ लाख १२ हजार ५२३ अशा एकूण २ लाख २८ हजार ४६९ मतदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. या सुनावणीत पुरावे म्हणून सादर केलेल्या कागदपत्रांनंतरच, त्यांचे नाव अंतिम मतदारयादीत राहणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ३३ लाख ५५ हजार २४४ एकूण मतदारांची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीनंतर ४ लाख ४९ हजार २५७ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली.



