कोल्हापूर – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेने वेश्या व्यवसाय प्रकरणी कंदलगावमधल्या एका लॉजवर मंगळवारी रात्री छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका करत एजंट सरिता रणजीत पाटील आणि लॉज मालक अमोल पोवार या दोघांना अटक केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन अतिग्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. दरम्यान या दोन्ही संशयितांना आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.




