कोल्हापुरात एम. डी. ड्रग विक्रीसाठी निघालेल्या दोघांना अटक… २० ग्रॅम ड्रग जप्त

कोल्हापूर – स्थानिक गुन्हे शाखा आणि शाहूपुरी पोलिसांनी जयंती नाला परिसरात कारवाई करत एम. डी. ड्रग विक्रीसाठी निघालेल्या दोघांना अटक केली आहे.

सॅम्युअल पवार आणि आदित्य कस्तुरे अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांकडून २० ग्रॅम वजनाचे एम डी. ड्रग आणि एक दुचाकी असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण,, शाहूपुरी पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमा शेळके, पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन, अंमलदार विशाल खराडे, अशोक पोवार, सत्यजीत तानुगडे, अरविंद पाटील, रत्नदीप जाधव आदींनी कारवाईत सहभाग घेतला.

Scroll to Top